सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची चौकशी सुरू आहे. खरं काय, खोटं काय मला माहिती नाही, पण जे कुणी दोषी असतील त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच पोलिसांनी आणि शासकीय यंत्रणेने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी सखोल चौकशी करावी
कराड तालुक्यातील एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी खासदार उदयनराजे भोसले आले होते, यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. खासदार उदयनराजे म्हणाले की, डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी सुरू आहे. खरं काय, खोटं काय मला माहिती नाही. पण जो कुणीही दोषी असेल, त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही. आता पोलिस आणि शासकीय यंत्रणेने सखोल चौकशी करावी.

