Homeमहाराष्ट्र‘दोष निवारण’च्या नावाखाली महिलांचे शोषण

‘दोष निवारण’च्या नावाखाली महिलांचे शोषण

पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक कारानामा उघडकीस

पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथील चांडोली गावात अध्यात्माच्या आड महिलांचे कथित शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवदत्त आश्रम येथे ‘महाराज’ म्हणून वावरणा-या नवनाथ गवळी या कथित भोंदू बाबाविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पीडित महिलेने राजगुरुनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून, ‘दोष निवारण’च्या नावाखाली आरोपीकडून महिलांकडे अयोग्य मागण्या केल्या जात असल्याचा आरोप आहे. तसेच विनयभंग आणि मानसिक छळ केल्याचेही पीडितेने नमूद केले आहे.

अधिकच्या माहितीनुसार, सुरुवातीला भीती आणि सामाजिक दबावामुळे तक्रार दडपून ठेवण्यात आली होती. मात्र, वाढत्या अत्याचारामुळे अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सदर प्रकरणात गुन्हा दाखल असूनही आरोपी नवनाथ गवळी अद्याप फरार असल्याने स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या कारवाईच्या गतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR