अमित शहांनी निवेदन द्यावे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक बेपत्ता होण्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावे, अशी मागणी केली. मला त्यांची काळजी वाटते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आम्हाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. यापूर्वी मी लापता लेडिजबद्दल ऐकले होते, परंतु लापता उपराष्ट्रपतींबद्दल मी पहिल्यांदाच ऐकत आहे. ते म्हणाले की गृह मंत्रालयाला याची जाणीव असली पाहिजे, म्हणून अमित शाह यांनी यावर निवेदन द्यावे अन्यथा धनखड यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यास भाग पडेल, असे सिब्बल म्हणाले.
विरोधकांना धनखड यांचे रक्षण करावे लागेल. जेव्हा त्यांनी आधी फोन केला तेव्हा धनखड यांचे पीए म्हणाले की ते आराम करत आहेत. यानंतर कोणीही फोन उचलला नाही. अनेक नेत्यांनीही याबाबत तक्रार केली. ७ ऑगस्ट रोजी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यावर चर्चा करण्यासाठी देण्यात आलेली स्थगन सूचना फेटाळली. आययूएमएलचे खासदार अब्दुल वहाब यांनी नियम २६७ अंतर्गत या मुद्यांवर चर्चा करण्याची मागणी केली होती.
धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव २१ जुलै रोजी राजीनामा दिला, ज्याची माहिती २२ जुलै रोजी राज्यसभेत देण्यात आली. तथापि, अनेक विरोधी नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांना भीती होती की हा काही राजकीय दबावाचा परिणाम असू शकतो, असे म्हटले.

