27.9 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeलातूरधनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची मनोज जरांगे यांनी घेतली भेट

धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची मनोज जरांगे यांनी घेतली भेट

लातूर : प्रतिनिधी
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती निर्णयाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून येथील पु. अहिल्यादेवी होळकर चौकात बेमुदत उपोषणास बसलेले अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे यांची बुधवारी सकाळी मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यांच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला.
मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीनिमित्त मनोज जरांगे पाटील मंगळवारी लातूरात मुक्कामी होते. बुधवारी धाराशिवला जाण्यापूर्वी त्यांनी पु. अहिल्यादेवी होळकर चौकात जाऊन अनिल गोयकर व चंद्र्रकांत हजार या उपोषणकर्त्यांची भेट घेतली. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, ही न्याय मागणी संविधानाला धरुन आहे. तुमच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. धनगर आरक्षण संदर्भात मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलेन, अशी हमी मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR