जळगाव : प्रतिनिधी
जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रतितोळा ३००० रुपयांनी घसरले आहेत. तर चांदीचे दर देखील किलोमागे ५००० रुपयांनी कमी झाले आहेत. धनत्रयोदशीनिमित्त जळगावच्या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. सोने-चांदीचे दर काहीसे कमी झाले असले तरी येत्या काळात मात्र सोने आणि चांदीचे दर वाढत राहतील अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.
जळगावच्या सराफ बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर विना जीएसटी एक लाख २८ हजार ३०० रुपयांवर आले आहेत तर चांदीचे दर विना जीएसटी १ लाख ७० हजार रुपयांवर आले आहेत. हे दर आज जरी कमी झाले असले तरीही ते वाढण्याची शक्यता आहे.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्या-चांदीची खरेदी करत असतात. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे आज खरेदी करणा-या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी चांगला मुहूर्त आहे. या मुहूर्तावर अनेकजण खरेदी करतात. सोन्याचे दर जवळपास १ लाख ३० हजार रुपये झाला आहे. तरीही ग्राहकांनी आज सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा या दिवशी सोने खरेदी करणे शुभ असल्याचे मानले जाते. त्यामुळेच ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. दरम्यान, पुढील चार दिवसदेखील सोने खरेदीमध्ये वाढ होत राहील, असे सांगण्यात येत आहे.
















