नाशिक : प्रतिनिधी
गांधीजींची हत्या करणा-या नथुराम गोडसेंच समर्थन करणारे कीर्तनकारसंग्रामबापू भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना एका व्हिडीओद्वारे कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले,माझी गाडी फोडायची असेल तर फोडा, पण जर कोणत्याही धर्म प्रचारकावर हल्ला झाला, तर मला संग्रामबापू भंडारे यातील ‘बापू’ हा शब्द काढून फक्त संग्राम भंडारे व्हावे लागेल.
संग्रामबापू यांनी आपल्या नव्या व्हिडीओत बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा एक व्हिडीओ समाविष्ट केला आहे. त्यांच्या मते, थोरात यांनी आपल्यावर झालेल्या कथित हल्ल्याचे समर्थन केल्याने आळंदी येथे लोक ‘महाराजांच्या गाड्या फोडा’ अशी भाषा वापरू लागले आहेत. या आरोपांमुळे बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या समर्थकांवर संग्रामबापू यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरत यांच्यावर मी हल्ला करणार असे म्हणालो नाही. तर त्यांना अंतर्मुख करण्यासाठी मला नथुराम गोडसे व्हावं लागेल, असं मी म्हटल्याचं कीर्तनकार संग्राम भंडारेंनी या आधी खुलासा केला आहे.
संगमनेरमधील १६ ऑगस्टच्या किर्तनावेळी माझ्यावर हल्ला झाला. कीर्तनकारांवर असे हल्ले व्हायला लागले तर ही धोक्याची घंटा आहे, असं असताना या घटनेचे बाळासाहेब थोरातांनी मात्र समर्थन केले. त्यामुळे बाळासाहेब थोरातांना या हल्ल्याचं गांभीर्य लक्षात यावे म्हणून मी नथुराम गोडसेंचे नाव घेतल्याचं भंडारे यांनी म्हटले आहे. असे ही ते म्हणालेत. दरम्यान कीर्तनावरून झालेल्या राड्यानंतर संगमनेरमध्ये राजकीय वाद उफाळून आला असताना संग्राम भंडारे यांचा अजून एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संग्रामबापू भंडारे हे कीर्तनाचे काम करतात. १६ ऑगस्ट रोजी संगमनेरच्या घुलेवाडीत त्यांचे कीर्तन सुरू असताना तिथे शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. कीर्तनाच्या कार्यक्रमात संग्रामबापू भंडारे यांनी राजकीय भाष्य केल्याचा आरोप नितीन गायकवाड याने केला. त्यानंतर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. गोंधळ घालणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते होते असा महायुतीचा आरोप आहे.

