22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeनांदेडधर्माबादमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ

धर्माबादमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना ठेवले कोंडून

नांदेड : प्रतिनिधी
राज्यातील २३ नगर परिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण १४३ सदस्यपदांसाठी आज (२० डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले. याचदरम्यान, नांदेडमधील धर्माबाद येथील एक घटना समोर आली आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप मतदारांकडूनच करण्यात येत आहे.
आज धर्माबाद पालिकेसाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील इराणी मंगल कार्यालय येथे मतदारांना बोलवून मतदान करू नका, असे भाजपाने सांगितल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी तत्काळ पोलिस दाखल झाले. पण तिथे कोणताही वादविवाद होताना दिसून आला नाही. जे मतदान भाजपाला होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान करू नका अशी विनंती भाजपा करत होते अशी चर्चा सध्या सुरू आहे.

अहिल्यानगरमधील कोपरगावमध्येही गोंधळ
अहिल्यानगरमधील कोपरगाव येथील मतदान केंद्रावर देखील गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली असून मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. आरोप करत असताना उपस्थित असणा-या पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली.

भुसावळमध्येही मतदान केंद्रावर शाब्दिक चकमक
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील प्रभाग क्रमांक ११ ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर पोलिस व निवडणूक केंद्रावरील कर्मचा-यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. निवडणूक केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले वाहन कर्मचारी सतत ने-आण करत असल्यामुळे पोलिसांनी कर्मचा-यांना अडवल्याने कर्मचारी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR