धाराशिवला होणार क्षेपणास्त्र, संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्प

ग्लोब फोर्ज लिमिटेड पहिल्या टप्प्यात करणार २००० कोटींची गुंतवणूक
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव येथील कौडगाव एमआयडीसीत लवकरच क्षेपणास्त्र आणि संरक्षण साहित्य निर्मिती करणा-या कारखान्याची उभारणी केली जाणार आहे. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर ग्लोब फोर्ज लिमिटेड अर्थात पूर्वीची निबे लि. ही नामांकित कंपनी पहिल्या टप्प्यात २००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ३००० जणांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयÞोजित पत्रकार परिषदेत आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यासाठी वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे धाराशिव आता डीफेन्स हब म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कौडगाव एमआयडीसीत दोन प्रकल्पांची उभारणी होणार आहे. पहिल्या १००० एकरांवर संरक्षण दलासाठी आवश्यक टीएनटी आणि प्रपोलेंट तयार केले जातील. नैसर्गिक खतही उपलब्ध होईल. यात तयार होणारा सीबीजी आणि खत कंपनीने जिल्ह्यातच द्यावे, असे ठरले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कंपनीचे प्रमुख गणेश निबे यांच्याशी ८ एप्रिल २०२५ रोजी पहिली भेट झाली होती. त्यांनी एक हजार एकर जागेची अपेक्षा व्यक्त केली होती. कौडगाव, होर्टी, माळुंब्रा, अपसिंगा आदी ठिकाणच्या जागा त्यांना दाखवण्यात आल्या होत्या. त्यांनी कौडगाव एमआयडीसीतील जागेवर शिक्कामोर्तब केले, असे आमदार पाटील यांनी सांगितले,

२००० अभियंते,
१००० कर्मचारी भरती
या प्रकल्पासाठी कंपनी धाराशिव जिल्ह्यात अंदाजे २,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे सुमारे ३००० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. यात २००० केमिकल व मेकॅनिकल इंजिनियर आणि १००० इतर कर्मचारी असतील. याशिवाय स्थानिक लघुउद्योग आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण होईल. हा प्रकल्प धाराशिव जिल्ह्याला संरक्षण उत्पादनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. सुरक्षितता, पुरवठा साखळी आणि धोरणात्मक दृष्टीने कौडगाव औद्योगिक क्षेत्राची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्र शासनाने याला इंटिग्रेटेड प्रोजेक्ट म्हणून मान्यता दिली आहे, अशीही माहिती आमदार पाटील यांनी दिली.

बायोगॅस प्लांटसाठी
शेतक-यांकडून घेणार गवत
धाराशिवमध्ये मिसाईल्स आणि संरक्षण साहित्य तयार करण्यासाठी मोठा प्रकल्प साकारत असलेल्या ग्लोब फोर्जकडून जिल्ह्यातील शेतक-यांसाठी नेपियर ग्रासवर आधारित सीबीजी (कॉम्प्रेसड बायोगॅस) प्लांट उभारण्यात येणार आहे. यासाठी लागणारे गवत जिल्ह्यातील शेतक-यांकडून घेतले जाणार आहे. यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

भविष्यात ५००० एकरवर डिफेन्स हब
कौडगाव एमआयडीसीला लागूनच भविष्यात जवळपास ५००० एकरांवर संरक्षण क्षेत्राशी निगडित एक महाकाय हब उभारण्याचे नियोजन आहे. ग्लोब फोर्ज (नेबे इंडस्ट्रीज) यांनी तसा शब्द दिला आहे. कौडगावजवळ उपलब्ध १० हजार एकर पडीक जमिनीवर २००४ मध्ये औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचे ठरवले होते. सुरुवातीला १५०० एकर संपादित केले. आता डिफेन्स हब साठी पडीक जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. भविष्यात देशाला संरक्षण साहित्य पुरवणारा जिल्हा म्हणून धाराशिव जिल्ह्याचा नावलौकिक होईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news