धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासकामांमध्ये तसेच धोरणनिर्मितीमध्ये सुसूत्रता राहावी,या उद्देशाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.केंद्र शासनाची ‘उडान’ योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण केंद्र शासनासाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहते,तर राज्यात ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री तथा अध्यक्ष,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या १९ व्या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेली बारामती,लातूर,धाराशिव आणि यवतमाळ ही विमानतळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारामती विमानतळ दि. १९/०८/२०२५ रोजी,धाराशिव विमानतळ दि.२०/०८/२०२५ रोजी, लातूर विमानतळ दि.२९/०८/२०२५ रोजी आणि यवतमाळ विमानतळ दि. १८/०९/२०२५ रोजी औपचारिकरित्या हस्तांतरित करण्याबाबत सामंजस्य करार केला आहे.यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

३० डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारामती विमानतळ,लातूर विमानतळ,धाराशिव विमानतळ व यवतमाळ विमानतळ ही विमानतळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सदर विमानतळांचा विकास / विस्तार करावा, तेथे विमानसेवेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व या विमानतळांची धावपट्टी विमानसेवेसाठी उपयुक्त / सुस्थितीत ठेवावी.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ही विमानतळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येत असली,तरी मूळ मालकी हक्क शासनाकडे कायम राहील.

बारामती,लातूर,धाराशिव व यवतमाळ विमानतळांबाबत भविष्यात राज्य शासन ज्या अटी व शर्ती विहित करेल किंवा जे धोरणात्मक बदल करेल ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला बंधनकारक असतील.
या निर्णयामुळे राज्यातील प्रादेशिक हवाई संपर्काला चालना मिळणार असून ‘‘उडान’’ योजनेअंतर्गत अधिक शहरांमध्ये विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या संदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले असून,धाराशिव विमानतळाचा विकास हा जिल्ह्याच्या औद्योगिक,शैक्षणिक,आरोग्य व पर्यटन विकासासाठी मैलाचा दगड ठरेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो,’’ असे ते म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news