Homeलातूरधार्मिक, सामाजिक उपक्रमांनी परशुराम जयंती साजरी

धार्मिक, सामाजिक उपक्रमांनी परशुराम जयंती साजरी

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरांमध्ये परशुराम जयंती २०२६ समितीच्या वतीने तीन दिवसीय सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. तर या निमित्ताने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १२ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक तब्बल १५३ जणांनी रक्तदान केले. परशुराम जयंतीच्या पहिल्या उपक्रमामध्ये १७ एप्रिल रोजी येथील कल्पतरू मंगल कार्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या गृह उद्योग प्रदर्शनीमध्ये बिबियन महिला मंडळ लातूरच्या सदस्याकडून दोन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला लातूरकराकडून मोठा प्रतिसाद मिळाला. तर १८ एप्रिल रोजी येथील विवेकानंद संस्कार संस्था जुना औसा रोड लातूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरासाठी जान्हवी प्रतिष्ठान लातूर आणि परशुराम जन्मोत्सव समिती यांनी पुढाकार घेतला होता. याच दिवशी सकाळी येथील परशुराम मंदिर परशुराम पार्क येथे परशुराम मंदिरामध्ये जन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिषेक परशुराम याग असे उपक्रम राबविण्यात आले तर येथील दयानंद सभागृहामध्ये ब्रह्माभूषण पुरस्काराने डॉ. राम पाटील, अ‍ॅड. कालिदास देशपांडे, निलेश देशमुख, कांचन भावठाणकर, डॉ. वृषाली देशमुख, प्रविण कस्तूरे, अ‍ॅड. संजय पांडे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि त्यांच्या पथकाने संतवाणी सादर केला.
भगवान परशुराम जन्मोत्सव उपक्रमासाठी जयंती समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष देशपांडे, डॉ. श्रीनिवास संदीकर, प्रा. एम. आर. कुलकर्णी, डॉ. अमित उटीकर, जितेंद्र देशमुख, धनश्री जोशी, प्रवीण देशपांडे, वल्लभ वावरे, योगेश चांदोरीकर, अनुराधा औसेकर, श्रीपादाचार्य जोशी, नंदकुमार कुलकर्णी, माधव कुलकर्णी, सीमा दडपे, जगदीश कुलकर्णी, वामन पाठक,  मनोज सप्तर्षी, डॉ गिरीश कुलकर्णी, अभिजित पाटील, पुरुषोत्तम देशमुख, उदय कुलकर्णी, शैलेश कुलकर्णी, प्रवीण कस्तुरे, सुधाकर जोशी, संतोष कुलकर्णी, गोपाळ जोशी, सचिन कुलकर्णी, अभिजीत देशपांडे आदींनी पुढाकार घेतला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR