अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरात धार्मिक स्थळ पहाटं जेसीबीने उद्ध्वस्त करण्याचा प्रकार झाला. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. अहिल्यानगरमधील कोतवाली पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात शहरात मोठा शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.
दोन च्या तुकड्या, शस्त्रधारी पोलिस, शीघ्र कृती दल, पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस बळ, पोलिस उपअधीक्षक, अतिरीक्त पोलिस अधीक्षक आणि स्वत: पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याप्रकरणी एका मुस्लिमाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या तपासणीवरून तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुस्लिमांचे समावेश आहे, अशी माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी दिली.
अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यान हे धार्मिक स्थळ आहे. काही समाजकंटकांनी २४ ऑगस्ट पहाटे तीन वाजता हे धार्मिक स्थळ पाडण्याचा प्रकार केला. काही प्रत्यक्षदर्शींनुसार ‘जेसीबी’चा वापर केल्याचे देखील म्हणणे आहे. धार्मिक स्थळा पाडले जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच, मोठ्या बंदोबस्ताने पोलिस बळ गांधी मैदानात पोचलं.
मागील दोन दिवसांपासून दोन गटांत या धार्मिक स्थळावरून वाद आहेत. आज पहाटे या दोन्ही गटातील काहींनी धार्मिक स्थळाला गालबोट लावण्याचा प्रकार केला. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पहाटेपासूनच शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी केले आहे.
मागील दोन दिवसांपासून दोन गटांत या धार्मिक स्थळावरून वाद आहेत. २४ ऑगस्ट पहाटे या दोन्ही गटातील काहींनी धार्मिक स्थळाला गालबोट लावण्याचा प्रकार केला. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पहाटेपासूनच शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी केले आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता, शांतता राखण्याचं आवाहन केले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे धार्मिक स्थळ पाडण्यात सहभागी असलेल्या तीन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच जेसीबी देखील जप्त करण्यात आला आहे. नागरिकांनी समाज माध्यमांवरील अफवांना बळी पडू नये. यासंदर्भात काही चुकीची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याच, त्याची माहिती तत्काळ स्थानिक पोलिसांना द्यावी. तसेच सायबर सेल देखील समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना सोमनाथ घार्गे यांनी दिल्या आहेत.

