Homeलातूरधिरज देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

धिरज देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ६ एप्रिल रोजी विविध ठिकाणी समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
मांजरेश्वर हनुमान येथे अभिषेक करून माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या उदंड आयुष्यासाठी मनोकामना करण्यात आली. बोरी येथे नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले, ज्यामध्ये अनेकांनी लाभ घेतला. चिचोलीराव येथे युवकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तांदुळजा येथे रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. मुरुड-अकोला येथे आरोग्य तपासणी शिबिरासोबत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण करण्यात आले. याच ठिकाणीही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या सर्व उपक्रमांमधून माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सर्वसमावेशक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्वाची झलक दिसून आली. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करत शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सेवा या क्षेत्रांना प्राधान्य देणारा त्यांचा दृष्टिकोन या कार्यक्रमांतून स्पष्ट झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे उपक्रम त्यांच्या विचारसरणीला साजेसे असून, वाढदिवस साजरा करताना समाजासाठी काहीतरी देण्याची भावना याचा प्रत्यय या कार्यक्रमांतून आला. नागरिकांमध्येही या उपक्रमांबद्दल समाधान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले
या कार्यक्रमास संतोष देशमुख, उमेश बेद्रे, अशोक काळे, श्रीकांत बैले, तात्यासाहेब देशमुख, राजकुमार पाटील, रघुनाथ शिंदे ,दतात्रय शिंदे, कैलास पाटील, अंनत बारबोले, रविंद्र काळे, विरसेन भोसले, दत्ता टेकाळे, बाळु माने, बाळासाहेब बिडवे, गणेश ढगे, दयानंद बिडवे, अनिल पाटील, शरयु गायकवाड, जनक गायकवाड, श्रीमंत गायकवाड, सिद्राम गायकवाड, नानासाहेब गायकवाड, शिवाजी बावणे, जयपाल बारते, फरमान शेख, कमलाकर अंनतवाड, ज्योती शिंदे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब कदम, मदन भिसे, सूर्यकांत सुडे, श्रीनिवास शेळके, तुकाराम गोडसे, श्रीकृष्ण काळे आदींची उपस्थिती होती.
विलास सहकारी साखर कारखान्यातर्फे मातोश्री वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप
माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. ६ एप्रिल रोजी लातूरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत वैशालीनगर निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप करुन सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सोमवारी सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार तथा कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याचे संचालक आणि मान्यवरांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधुन त्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक सर्वश्री रविंद्र काळे, अमृत जाधव, सतीश शिंदे-पाटील, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, नितीन पाटील, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, हणमंत पवार, नेताजी साळुंके(देशमुख), रामराव साळुंके, दीपक बनसोडे, सुभाष माने, रमेश देशमुख यांच्यासह कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदगीरमध्ये विपीन जाधव यांच्यातर्फे अन्नदान 
महाराष्ट्राचे युवा नेते, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस उदगीरमध्ये विपीन जाधव यांच्या वतीने वृद्धाश्रम, आधार शहरी बेघर निवारा केंद्र येथे अन्नदान करून साजरा करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस कल्याण पाटील, उदगीर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संतोष बिरादार, विजय चवळे, नगरसेवक ओम गांजुरे, विराज पाटील, अमित खंदारे, महेश स्वामी, अभिजीत माने, जलील शेख तसेच इतर सहकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR