Homeलातूरधिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठांना स्नेहभोजन

धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठांना स्नेहभोजन

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहरातील मातोश्री वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना जिल्हा बँक कर्मचारी संघाच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला व त्यांना वाढदिवसाच्या  उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी शुभेच्छा  दिल्या. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक महिला, पुरुष यांनी आपले विचार व्यक्त केले तर जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, संचालक  संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक  मारोती पांडे, संचालक अनुप शेळके, संचालक  राजकुमार पाटील, संचालिका सौ. स्वयंप्रभा पाटील, प्रभाकर केंद्रे यांच्यासह जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, मातोश्री वृद्धाश्रम येथील अधीक्षक व्यवस्थापक, ज्येष्ठ  नागरिक महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR