मुंबई : प्रतिनिधी
काल चित्रपटाचे प्रिव्हयू शो झाले. त्याला सुद्धा तुफान प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी टेक्निकल समस्येमुळे शो रद्द करावे लागले. आजपासून अधिकृतपणे हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुसाट निघाला असून दुपारी १२ वाजेपर्यंत भारतात या चित्रपटाने ६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा आहे. ‘पठाण’, ‘स्त्री २’ आणि ‘वॉर’या चित्रपटांचे कमाईचे रेकॉर्ड मोडले आहे. ‘धुरंधर : द रिव्हेंज’ ने केवळ प्रिव्हयू शोमधूनच भारतात तब्बल ४४ कोटी रुपयांची कमाई केली.
‘धुरंधर : द रिव्हेंज’ पहिल्या दिवशीच्या कमाईचा हा आकडा मागे टाकणार हे निश्चित आहे. पहिल्या चार दिवसांतच हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल असे चित्र आहे. कारण ‘धुरंधर’चा पहिला पार्ट खूप रंजक वळणावर संपला होता. रेहमान डकैतनंतर आता त्याची ल्यारी आणि हमझा मझारी यांचे पुढे काय होणार? बडे साहब कोण? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला प्रेक्षक उत्सुक आहेत. बॉक्स ऑफिसवरच्या कमाईचे आकडेच चित्रपटाच्या क्रेझबद्दल सर्वकाही सांगून जात आहेत.

