29.9 C
Latur
Tuesday, February 10, 2026
Homeमहाराष्ट्रधुळ्यात ईव्हीएम मशिन फोडली

धुळ्यात ईव्हीएम मशिन फोडली

धुळे : धुळे महापालिका निवडणुकीत राडा झाला आहे. मतदान केंद्रात घुसून, ईव्हीएम मशिन फोडण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रताप केल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला. या प्रकारामुळे मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प पडली होती.

पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त वाढवला होता. त्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. मतदानाच्या आदल्या दिवसापासून धुळे शहरातील वातावरण तापले असून, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडे होत आहेत. यातच ईव्हीएम मशिन फोडण्यात आल्याची भर पडली. त्यामुळे मतदानावेळी तणावाचे वातावरण होते.

धुळे महापालिका निवडणुकीत तणावपूर्ण वातावरणात मतदान सुरू आहे. यातच प्रभाग क्रमांक ८ मध्ये ईव्हीएम मशिनची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याचा आरोप एकनाथ शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. पोलिसांनी त्यांना जाब विचारला. बंदोबस्त असताना, ते इथं आले कसे? ईव्हीएम मशिन फोडेपर्यंत बंदोबस्तावरील पोलिस काय करत होते, अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत नोंद घेतली आहे.
मतदानाच्या काही दिवसांपासून शहरातील वातावरण दूषित केले जात आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे. मतदानाच्या दिवशी हा प्रकार म्हणजे, दादागिरी अन् दहशत माजवण्याचा आहे,’ असा आरोप आमदार मंजुळा गावित यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR