धुळे : प्रतिनिधी
नाशिकमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली होती. चिमुकल्या मुलीला विष पाजून त्यानंतर पती-पत्नीने गळफास घेतला होता. आता धुळ्यात एकाच कुटुंबातल्या चौघांनी जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
एकाच कुटुंबातल्या चौघांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. प्रमोद नगर भागातल्या समर्थ कॉलनीत ही घटना उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रवीण मानसिंग गिरासो हे त्यांच्या कुटुंबासह प्रमोद नगर भागात समर्थ कॉलनीत राहत होते. प्रवीण यांनी पत्नी दीपा, मुलगा मितेश आणि सोहम यांच्यासह आत्महत्या केली. प्रवीण यांचे वय ४८, तर पत्नी दीपा या ४४ वर्षांच्या होत्या. मुलगा मितेश १८ तर सोहम १३ वर्षांचा होता.