लातूर : प्रतिनिधी
पावसाने ओढ दिल्याने माणसांच्यापासून पशु, पक्षी, प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जिल्हयात चांगला पाऊस पडावा म्हणून नाना नानी उद्यान परिसरात प्रभुराज प्रतिष्ठान, लातूर वतीने धोंडी…धोंडी…पानी दे अशी आर्जव करीत शिवभक्तांनी वरुनराजाला साकडे घातले.
पावसाळयाच्या दिवसात वरुनराजाने पाठ फिरविल्याने शेतकरी हावालदिल झालेला आसून चिंतेत आहे. तसेच पशु, पक्षी पाण्यापासुन व्याकुल झाले आहेत. नागरिकांची ही कांही भागात पाण्यासाठी भटकंती होत आहे. प्रत्येक शेतकरी आज अभाळाकडे लक्ष लावून बसला आहे. तरी पण वरुनराजाचे आगमन चांगल्या प्रकारे होइनासे झाले, आशा परिस्थितीवर मात करण्यासाठीव चांगला पाऊस पडावा या करिता मिरवणूक काढत धोंडी… धोंडी…पाणी दे… असे म्हनत वरुनराजाला साकडे घालन्यात आले आहे. यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. अजय कलशेट्टी, डॉ. दत्तात्रय अपसिंगेकर, मधुकर खरे, अशोक पंचांक्षरी, विलास भुमकर, सचिन गोलावर, नेमचंद लाड, अजय घाळे, विजय वारद, अशोक कांबळे, अभिजित सिरसाठ, अजय श्रीमंगले आदी उपस्थित होते.
















