21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रनंदुरबारमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांचा राजीनामा

नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांचा राजीनामा

नंदुरबार : विशेष प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पदाधिका-यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी संपविण्याच्या घाट जयंत पाटील यांनी घातला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी जयंत पाटील पक्षाला संपवण्याचे काम करत आहेत. जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना ताकद देण्याचे काम करत आहेत. असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिका-यांनी राजीनामास्त्र उगारल्याने याचा मोठा फटका हा जिल्ह्यात महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. पदाधिका-यांकडून जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे आता या संदर्भात पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शरद पवारांना नोटीस
दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस पाठविल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. काही दिवसांपूर्वी पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला होता, हे प्रकरण चांगलंच गाजलं, याच प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR