नक्षलवाद आता ११ जिल्ह्यांपुरताच

मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपविणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने येत्या ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा प्रण केलेला आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी नक्षलवाद्यांच्या तळांवर हल्ले केले जात आहेत. तर काही नक्षलींचे प्रबोधन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले जात आहे. या मोहिमेला चांगले यश मिळाले असून, आता नक्षलवाद फक्त ११ जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

देशात १९६७ सालापासून नक्षलवादी चळवळ पाहायला मिळते. आता याच नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने नुकताच रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. यामध्ये अगोदर नक्षलवादाचा प्रभाव असणारे जिल्हे आणि आता नक्षलवादाचा प्रभाव असलेले जिल्हे दाखवण्यात आले आहेत.

२०१४ अगोदर १८२ जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव होता. आता ही संख्या फक्त ११ जिल्ह्यांपर्यंत राहिली आहे. गृहमंत्रालयाच्या दाव्यानुसार २०१४ साली ३३० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नक्षली हिंसेच्या घटना घडल्या होत्या. आता ही संख्या फारच कमी झाली आहे. अगोदर १८ हजार वर्ग किलोमीटरपर्यंत नक्षलवादाचा प्रभाव होता. आता तो फक्त ४२०० वर्ग किलोमीटरपर्यंत शिल्लक राहिलेला आहे.
२००४ ते २०१४ पर्यंत
१६ हजारांवर नक्षली हिंसा
२००४ ते २०१४ या काळात एकूण १६,४६३ नक्षली हिंसेच्या घटना घडल्या होत्या. आता ही संख्या २०१४ ते २०२५ पर्यंत ५३ टक्क्यांनी कमी होऊन ७,७४४ पर्यंत कमी झालेली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news