लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या गंजगोलाईतील ‘प्रथम मानाच्या सार्वजनीक गुढी महोत्सव’ समिती २०२६ च्या अध्यक्षपदी लातूर मनपा स्थाई समिती सदस्य तथा नगरसेवक विकास कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच स्वागताध्यक्षपदी अमोल गिते यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड सार्वजनिक गुढी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल यांनी बैठकीत जाहीर केली आहे.
उर्वरीत कार्यकारीणीत उपाध्यक्ष संजय सोनकांबळे, बालाजी गवळी, कोषाध्यक्ष रामेश्वर भराडीया, सचिव नितिन पडिले, कार्यक्रम अध्यक्ष रामभाऊ जवळगे, सहकोषाध्यक्ष नारायण भूतडा, सदस्य काकासाहेब घुटे, बालाजी नागरगोजे, रवि जाधव, सचिन गांगले आदी. या नूतन कार्यकारीणीचा सत्कार संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल यांच्या हस्ते करणात आला. सार्वजनिक गुढी महोत्सवाचे हे ३८ वे वर्ष आहे. लवकरच विविध सामितीचे गठण आणि सार्वजनीक उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. नूतन कार्यकारीणीचे स्वागत विविध स्तरातून होत आहे.

