Homeलातूरनगरसेविकांच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद

नगरसेविकांच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या लातूर शाखेच्या वतीने   नवनिर्वाचित नगरसेविकासाठी  कार्यशाळा आयोजित  केली होती. या कार्यशाळेस १९ नगरसेविका उपस्थित होत्या. या प्रसंगी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना महापालिकेच्या बजेटचा अभ्यास करून विकास कामाची मागणी पाहिजे, असे मत ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. अर्चना आपटे यांनी  प्रेरणा गीत म्हटले. स्वागत संघटनेच्या शहर अध्यक्ष प्रेमा बाहेती आणि सचिव संजीवनी सबनीस यांनी केले. भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुमुदिनी भार्गव यांनी प्रास्ताविक करून संघटनेची माहिती दिली. कार्यशाळा आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. माजी नगरसेविकास अ‍ॅड. स्मिता परचुरे यांनी त्या नगरसेविका असतानाचे कांहीं अनुभव आणि पक्ष निरपेक्ष कार्य किती महत्वाचे ते सांगितले. ज्येष्ठ पत्रकार अरूण समुद्रे यांनी मार्गदर्शन केले. प्रेरणा होनराव आणि स्वाती घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुरेखा  काळे यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचलन अनघा अंधोरीकर यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR