निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील तेरणा व मांजरा नदी काठच्या गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नद्यांच्या संगमावर दि १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेत शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी निलंगा शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सपोनि विठ्ठल दुरपडे, औराद मंडळ अधिकारी बालाजी मुंडे , मंडळ अधिकारी हलगरा धनराज गायकवाड, मंडळाधिकारी राजकुमार देशमुख, माजी सरपंच मोहनराव भंडारे, सरपंच सौ आरती बालाजीराव भंडारे, बाबुराव भंडारे, ग्रामविकास अधिकारी एस. एच. गिरी, तगरखेडा तलाठी परमेश्वर माने, औराद तलाठी शुभम वाघमारे, हालसी (तु ) तलाठी नागनाथ काळे , बोरसुरी तलाठी ज्ञानोबा लहाने, बालाजी भंडारे, पद्मसिंह पाटील, चंद्रकांत बोंडगे, प्रताप उर्फ पापा भंडारे, अमोल बोंडगे ,विलास कांबळे , महेंद्र गिरी आदीसह शेतकरी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी औराद येथील बौद्ध स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. तसेच औराद येथील लातूर-जहीराबाद रस्त्यावरील पुलाची पाहणी केली.
















