लातूर : प्रतिनिधी
तुळजापूर-लिंगायत महासंघाच्या धाराशिव शाखेच्या वतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २२ मार्च रोजी तुळजापूर येथे पार पडलेल्या लिंगायत समाज अधिवेशनामध्ये भातांगळी ता.जि. लातुरचे सुपुत्र लालबहादूर शास्त्री माध्यमिक वचन माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य नरेंद्र सोमनाथ आप्पा गिरवलकर यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार लिंगायत महासंघाचे प्रांत अध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते व शि. भ. प. शिवराज नावंदे गुरुजी या दोघांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उमरगा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह आगाशे, बेंबडे प्रदिप, घोडके व श्रीकांत पत्की तसेच लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

