नवरात्रोत्सवानिमित्त त्रिशक्तीचा जागर, कर्तृत्ववान महिलांचा गौरव

निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथे व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित नवरात्र दुर्गा महोत्सव २०२६ अंतर्गत ‘जागर स्त्रीशक्तीचा’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षा, आरोग्य जागरूकता आणि सामाजिक योगदानाची दखल घेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा गौरव करण्यात आला. धार्मिक उत्सवास सामाजिक जाणिवेची जोड देत महिलांच्या कर्तृत्वास प्रोत्साहन देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लघुउद्योजिका शोभा राजेंद्र कुंभार या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत बांगर हे होते तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून व्याख्यात्या रंजना हासुरे या उपस्थित होत्या. लातूर सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षक सीमा बेद्रे व पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनीता कसपटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

महिला सक्षमीकरणासह सायबर सुरक्षेचा संदेश रंजना हासुरे यांनी नवरात्रोत्सवाचे महत्त्व विशद करताना, पूजाअर्चेबरोबरच विचार, वर्तन आणि कृतीत सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिलांनी स्वत:च्या क्षमतांची जाणीव ठेवून स्वावलंबी व सक्षम बनावे, असे आवाहन त्यांनी केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत बांगर यांनी मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव आणि कौटुंबिक समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले. व्यापार व उद्योग क्षेत्रातील शोभा राजेंद्र कुंभार, कृषी क्षेत्रातील गंगाबाई सुभाष मुळे, शिक्षण क्षेत्रातील श्रुती पंकज कुलकर्णी, लातूर अर्बन बँकेच्या संचालिका प्रज्ञा बेद्रे आणि कुक्कुटपालन क्षेत्रातील दैवता लक्ष्मण जाधव यांच्यासह वैष्णवी लकशट्टे, रामेश्वरी सज्जनशेट्टी, यमुना आमले, पर्वती कांबळे व तसलीम वलांडे यांचा सत्कार करण्यात आला.

याशिवाय आरोग्य सेविका, महिला पोलीस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामपंचायतीच्या महिला स्वच्छता कर्मचारी, विविध महिला मंडळे, बचत गट आणि प्रगती शेतकरी गटाच्या प्रतिनिधींचाही गौरव करण्यात आला. वीरुपाक्षेश्वर महिला मंडळ, राजस्थान महिला मंडळ, सिद्धिविनायक महिला मंडळ, विठ्ठल-रुक्मिणी महिला मंडळ आणि जय भवानी अन्नपूर्णा समूहाच्या प्रतिनिधींचा यात समावेश होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news