लातूर : प्रतिनिधी
राज्यात नावलौकिक असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरच्या वतीने २२ डिसेंबरपासून कांदा, बटाटा, आद्रक, लसूण या मालाचा सौदा रिंग रोड नवीन गूळ मार्केटमध्ये निघणार असून सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सौदा निघणार आहे. याचा शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश बावणे यांनी केले आहे.
यापूर्वी जुने गूळ मार्केट येथे कांदा, बटाटा, लसूण, आद्रक यांचा सौदा आठवड्यातून मंगळवार व शनिवार या दोन दिवशी निघत होता तेथे सौद्यासाठी जागेची कमतरता तसेच शेतक-यांची मागणी व मालाची आवक मोठया प्रमाणावर येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे या वेळी सभापती जगदीश बावणे यांनी सांगितले.

