लातूर : प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची डॉ. जनार्दन वाघमारे विचार मंचच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी करण्यात आली.
या शिष्टमंडळात विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुधीर साळुंखे, सचिव डॉ. दिगंबर नेटके, सिनेट सदस्य डॉ. अशोक मोटे, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, प्राचार्य डॉ. सतीश यादव, डॉ. विनोद चव्हाण, विक्रम कदम, अॅड. निशांत वाघमारे आदींचा सहभाग होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना फोनवर डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या स्मारकासंदर्भात देखील सूचना केल्या.
















