25 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeमहाराष्ट्रनांदेडनंतर आता अकोल्यात आयकर विभागाचे धाडसत्र

नांदेडनंतर आता अकोल्यात आयकर विभागाचे धाडसत्र

भंडारी फायनान्सशी कनेक्शन, मोठा व्यवहाराचा संशय
अकोला : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात आयकर विभागाकडून अनेक ठिकाणी कारवायांचे सत्र सुरू आहे. नांदेडमध्येही आयकर विभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईत कोट्यवधींची बेहिशोबी संपत्ती हाती लागली. या कारवाईत तपासाचे धागेदोरे आणखी उलगडत असून, नवनवीन माहिती समोर येत असून, त्या पद्धतीने कारवाया सुरू आहेत. त्यातूनच नांदेडनंतर आता अकोल्यात आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. अकोल्यातील अशोकराज आंगडिया कुरियरचे नांदेडमधील धाडीशी कनेक्शन असल्याची प्राथमिक माहिती पुढे येऊ लागली आहे.

अकोल्यातील कोठडी बाजारातील अशोकराज आंगडिया कुरियर सर्व्हिसवर आयकर विभागाने धाड टाकली. आज सकाळपासून आयकर विभागाच्या पथकाकडून कुरियरच्या कार्यालयात तपासणी केली जात आहे.अशोकराज आंगडिया कुरियरवरील तपासणीचे नांदेडमध्ये झालेल्या आयकर धाडीशी कनेक्शन असल्याची प्रथमिक माहिती पुढे येऊ लागली आहे. कुरियरच्या माध्यमातून मोठ्या रकमांचा व्यवहार झाल्याचा आयकर विभागाला संशय आहे. त्यामुळेच ही तपासणी मोहीम सुरू असल्याचे समजते. या धाडीबाबत मोठी गोपनियता ठेवली असल्याने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यासाठी कुणीच पुढे आलेले नाही. आयकर विभागाकडून आणखी काही कुरियर कंपन्यांवर धाडीची शक्यताही वर्तवल्या जात आहे.

नांदेडच्या भंडारी
फायनान्सशी संबंध?
नांदेडमधील संजय भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली. त्यानंतर आता अकोल्यात आयकर विभागाकडून कोठडी बाजारातील अशोकराज आंगडिया कुरियर सर्व्हिसवर धाडी टाकत तपासणी केली जात आहे. या कारवाईत आणखी कोणती नवी माहिती हाती येते, याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR