26.2 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeनांदेडनांदेड शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

नांदेड शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

नांदेड : प्रतिनिधी

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जि‍ल्‍हाधि‍कारी कार्यालय व महाराष्‍ट्र राज्‍य आपत्‍ती व्यवस्थापन प्राध‍िकरण, महसूल व वन, मदत व पुनर्वसन आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभाग मंत्रालय मुंबई यांच्यातर्फे आयोजित महसूल पंधरवड्याचे औचित्य साधून एक धाव सुरक्षेची-या उपक्रमांतर्गत येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.

या स्पर्धेला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कु-हे यांनी सहभागी स्‍पर्धक – युवक युवतीना आपत्‍तीमध्‍ये बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शक केले व मॅरेथॉनला ह‍िरवा झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरूवात झाली. या मॅरेथॉन स्पर्धेचा छ. शि‍वाजी महाराज पुतळा, एस.पी.ऑफीस, आय.टी.आय. कॉर्नर व्‍हीआयपी रोड मार्गे जि‍ल्‍हा क्रीडा संकुल येथे समारोप झाला. विविध आपत्ती संदर्भात युवक व युवतींमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते.

मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जि‍ल्‍हयातील एन.एस.एस.,एन.सी.सी., स्‍काऊट व गाईड, होमगार्ड, विवि‍ध स्‍पोर्टस् अ‍ॅकडमी, आपदा मित्र, महसूल वि‍भागाचे अधि‍कारी व कर्मचारी सहभागी झाले होते. श्रीनि‍केतन वि‍द्यालय, एन.एस.बी. कॉलेज, सायन्‍स कॉलेज, पी‍पल्‍स कॉलेज, यशवंत कॉलेज, आय. टी. एम. कॉलेज, जवाहर महाविद्यालय,वसंतराव नाईक कॉलेज, म.फुले कॉलेज मुखेडसह नायगाव, अर्धापूरसह जि‍ल्‍ह्यातील शाळा कॉलेजच्‍या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्‍साहात सहभाग घेतला. या मॅरेथॉनमध्‍ये मुलींमध्‍ये प्रथम तेजस्‍वीनी संघरत्‍न कांबळे, द्वितीय आर्या भगवान दुथडे, तृतीय रंजना रमेश यादव व मुलामध्‍ये प्रथम रितेश साहेबराव टोमके, द्वि‍तीय परमेश्‍वर सुर्यकांत रामापुरे, तृतीय लक्ष्‍मण दत्‍ता राठोड व‍िजेते ठरले. सायन्‍स कॉलेल व एन.एस.बी.कॉलेजच्‍या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली.

ही मॅरेथॉन यशस्‍वी करण्‍यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत तथा अध्‍यक्ष जि‍ल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधि‍करण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली महेश वडदकर नि‍वासी उपजि‍ल्‍हाधि‍कारी तथा मुख्‍य कार्यकारी अधि‍कारी, किशोर कु-हे, जिल्‍हा आपत्‍ती व्यवस्‍थापन अधि‍कारी यांच्‍या नि‍योजनाखाली जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रभागाचे महसूल सहायक बारकुजी मोरे यांनी सर्व विभागाशी समन्व‍य ठेवून मॅरेथॉन यश्‍स्‍वी करण्‍याचा प्रयत्‍न केला. जि‍ल्‍हा क्रीडा अधिकारी, जयकुमार टेंभरे यांच्‍यासह जि‍ल्‍हा क्रीडा अधि‍कारी कार्यालयाचे अधि‍कारी, कर्मचारी, कोच व गणेश मुंढे-चौरंग मार्फत मॅरेथॉन स्‍पर्धेर्चे परीक्षण केले. यावेळी मल्‍िल‍कार्जुन करजगी- संचालक एन.एस.एस. स्‍वामी रामानंद ती‍र्थ मराठवाडा वि‍‍द्यापीठ, एस.डी.आर.एफ. चे पोलीस निरीक्षक पी.एस. रुपदास सोनवणे, होमगार्डचे वरीष्‍ठ पलटन नायक शेख बसीरोद्दीन, बळवंत अटकोरे, शंकपाळे आदींसह विविध शाळा महाविदयालय, एन.एस.एस, एन.सी.सी., स्‍काऊट गाईड, होमगार्ड, एस.डी.आ.एफ. आपदा मित्र संबंधित अधिकारी, कर्मचारी, प्राध्‍यापक, शि‍क्षक व कोच यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR