24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रनागपुरात अडीच कोटींची चोरी

नागपुरात अडीच कोटींची चोरी

नागपूर : प्रतिनिधी
राजनगर परिसरात पेट्रोल पंप व्यावसायिक बलजींदरसिंग इंद्रजित सिंग नय्यर यांच्याकडे केवळ २२ मिनिटांत सुमारे अडीच कोटींचा मुद्देमाल लंपास करणा-या धाडसी चोरी प्रकरणी चार राज्यांत पोलिसांची शोध मोहीम सुरू झाली असताना २४ तासांत अद्यापही या हायटेक घरफोडीचा उलगडा होऊ शकलेला नाही.

नय्यर कुटुंबीयांच्या घरातील दार, प्रत्येक बेडरूम, कपाट अशी इत्थंभूत माहिती असणा-या निकटवर्तीयानेच ही चोरी केल्याचा संशय शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासाठी मोठी टीप देण्यात आली असावी, असाही पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी आतापर्यंत शहरातील कुख्यात घरफोड्यांची झाडाझडती घेतली. मात्र, पोलिसांना ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

चार राज्यांत चोरट्यांच्या शोधासाठी सात पोलिस पथके रवाना झाली आहेत. यातील चार पथके ही मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा व हैदराबादकडे गेली आहेत. मध्य प्रदेशातील मांडला येथे एका संशयित चोरट्याची चौकशी करण्यात आली. मात्र, घटनेच्या वेळी तो घरीच असल्याचे आढळून आले. आता पोलिस या परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR