नागपुरात सुनेची कु-हाडीने हत्या करत सास-याची विहिरीत उडी

नागपूर : प्रतिनिधी
जादूटोणा करून मुलाचा जीव घेतल्याच्या संशयातून एका ७० वर्षीय वृद्ध सास-याने स्वत:च्या सुनेची कु-हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी, पाहुणे ले-आउट परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नत्थूलाल यांच्या मुलाचा २०१९ मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हापासून सुनेनेच जादूटोणा करून मुलाचा जीव घेतल्याचा संशय नत्थूलाल यांच्या मनात होता. या कारणावरून घरात सतत वाद होत असत. नत्थूलाल नेहमी लक्ष्मीला मारून टाकण्याची आणि स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देत असे. आरोपीच्या पत्नीची मानसिक स्थितीही ठीक नसल्याचे समोर आले आहे.

शनिवारी दुपारी लक्ष्मी यांची मुलगी नोकरीवर आणि मुलगा घराबाहेर गेला होता. लक्ष्मी घराच्या मागील बाजूस कपडे धुत असताना आरोपीने संधी साधून त्यांच्यावर कु-हाडीने सपासप वार केले. गंभीर दुखापत झाल्याने लक्ष्मी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सुनेची हत्या केल्यानंतर आरोपीने घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेतली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने नत्थूलालला बाहेर काढले. फुफ्फुसात पाणी गेल्याने त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले असून सुनेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यशोधरानगर पोलिसांनी नत्थूलालविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Farmer Sucide|दुष्काळ अन् कर्जाचा ताण; निलंग्यात ४१ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
01:41
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये दुर्गामातेच्या आगमनाची धूम! आदिवासी नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष
02:56
Video thumbnail
Latur|उदगीरच्या सोमनाथपूरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
01:34
Video thumbnail
Nanded|माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात बेशिस्त ऑटोचालकांवर वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा!
01:18
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43

Latest news