लातूर: प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील गातेगाव येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक नाथसिंह देशमुख यांच्या मातोश्री चंद्रप्रभा किशनराव देशमुख यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्याबद्दल गुरुवारी सायंकाळी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, विलास साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी गातेगाव येथे जाऊन देशमुख कुटुंबाचे सांत्वन केले. याप्रसंगी दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख, धिरज देशमुख यांनी चंद्रप्रभा देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली
याप्रसंगी नाथसिंह देशमुख, सौ पूर्वादेवी देशमुख, शिल्पा निंबाळकर, स्नेहलता देशमुख, परमसिंह देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी उपस्थित होते.
















