अहिल्यानगर : प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अत्यंत भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. नाना पाटेकर म्हणजे समाज आणि देशासाठी दीपस्तंभासारखे होते, असे अण्णा म्हणाले. जलसंधारण, नाम फाउंडेशन अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी मोठे कार्य केले. त्यांचे जाणे म्हणजे समाजासाठी मोठी हानी असून, असा माणूस होणे नाही.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे नाना पाटेकरांवर बोलताना अस्वस्थ झाले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. डोळ्यातून अश्रू येत होते. नाना पाटेकरांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. त्यांनी खूप मोठे काम केले. असा माणूस होणार नाही, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नाना पाटेकर गेल्याचे वृत्त ऐकून अण्णा हजारेही अस्वस्थ झाले. मीडियासमोर त्यांना अश्रू आवरणे कठिण झाले. नाना सारखा माणूस होणार नाही. त्यांनी फार मोठे काम केले आहे. नुसते काम केले नाही, वादळी सागरात संचार करणा-या नौकांना जसा दिपस्तंभ आधार असतो, तसे नाना पाटेकरांचे जीवन दीपस्तंभासारखे आधार होतें. समाज आणि देशासाठी नाना पाटेकर दीपस्तंभासारखे आधार होते. त्यांनी केवळ एकाच क्षेत्रात काम केले नाही. त्यांनी सर्वच क्षेत्रात खूप मोठे काम केले. साधा पाण्याचा प्रश्न त्यांनी उचलून धरला. पाणी अडवा, पाणी जिरवा. हे त्यांनी कृतीने करून दाखवले असे अण्णा हजारे म्हणाले.
अशी माणसे होणार नाही
अशी माणसे होणार नाही. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले.समाजाला दिशा देणारेकाम झाले. माणसे येतात जातात. येणे-जाणे हे एका कालचक्रासारखे सुरू आहे. पण काही माणसं समाजाला दिशा देऊन जातात. देशाला नवीन दिशा देऊन जातात, असे काही माणसांचे जीवन असतं. नाना पाटेकरांच्या जीवनात ते पाहायला मिळालं, असंही अण्णा म्हणाले.
नानांचे जाणे दु:खद : पोपटराव पवार
यावेळी पोपटराव पवार यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. नानांचे जाणे दु:खद आहे. दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्राचा आधारवड हरवला. नानांचा आणि हिवरे बाजारचा ऋणानुबंध २२ सप्टेंबर २०१५ पासूनचा होता. नानांनी त्यांच्या घरी गणपतीसाठी बोलवले होते. त्यावेळी नानांनी मारलेली मीठी आजही स्मरणात आहे. नाम फाउंडेशनची सुरुवातही हिवरे बाजारपासूनच झाली, असं पोपटराव पवार म्हणाले.
















