लातूर : प्रतिनिधी
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा नारीरत्न पुरस्कार येथील तब्बल २५ महिलांना प्रदान करण्यात आला असून ‘एकमत’च्या कर्मचारी नंदिनी राजकुमार जाधव(गोरे) यांनाही सन्मानित करण्यात आले.
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नारीरत्न पुरस्कार सोहळा २०२६ नुकताच पार पडला. स्वत:च्या क्षेत्रात अनेक संकटांना सामोरे जाऊन स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या सर्वसामान्य घरातील २५ महिलांचा ‘नारीरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हीडिएअच्या संचालिका संगीता मोळवणे होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून सोनाली केंद्रे, शोभाताई पाटील, संगिता मिरचे, सोनाली थोरमोटे, विद्या देशमुख, वनिता काळे, वैभव तळेकर, रंजना चव्हाण यांची उपस्थित्ीा होती.
प्रास्तविक जिजाऊ ब्रिगेड लातूर(पूर्व) च्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई पाटील (तळेकर) यांनी केले. तसेच या प्रसंगी प्रमुख वक्त्या रंजनाताई हासुरे यांनी ‘आजची स्री समजून घेताना’ या विषयी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन हिरा हेंडगे, पवार कौसल्या यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मीरा देशमुख, योगिता ठाकूर, जयश्री हांडे, जयश्री देशमुख, उमा इतापे, सुवर्णा पाटील, अनिता मुदगुले, तनुजा तळेकर, जयश्री सावंत, देवकन्या सूर्यवंशी छाया लातूरकर यांनी प्रयत्न केले. जिजाऊ वंदना कोषाध्यक्ष मीराताई देशमुख यांनी गायली तर आभार मंदाकिनी गंभीरे यांनी मानले.

