27.3 C
Latur
Thursday, June 12, 2025
Homeमहाराष्ट्रनाशकात शेतकरी आक्रमक

नाशकात शेतकरी आक्रमक

पंतप्रधानांच्या सभेआधी कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन

नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौ-यावर असून पिंपळगाव येथे ते जाहीर सभा घेणार आहे. या सभेकडे देशाचे लक्ष लागलेले असतानाच लासलगावला कांद्याच्या माळा घालून शेतक-यांनी आंदोलन केले आहे.

दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील सभेअगोदरच लासलगाव येथे शेतक-यांनी बुधवारी सकाळी कांद्याच्या माळा घालून कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

यावेळी लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळांसह १५ शेतक-यांना ताब्यात घेतले आहे. तर शेतकरी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन आणि लासलगाव शहर विकास आघाडीच्या अशा एकूण वीस जणांना आतापर्यंत लासलगाव पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR