नाशिकच्या साधूग्राममध्ये दहा लाख साधू-महंत राहणार?

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सिंहस्थासाठी येणा-या साधू, महंत व भाविकांसाठी पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाण्याचा होणारा वापर लक्षात घेता सिंहस्थात २६० दशलक्ष लिटर पाण्याची प्रतिदिन वाढ होणार असून, या काळात सुमारे ९४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा प्रतिदिन शहरात केला जाणार आहे.

सध्या शहराला ५२० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात वार्षिक सरासरी साडेपाच टक्के वाढ धरून सध्या ६८० दशलक्ष लिटर पाणी वितरण होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मनपाने रस्ते आणि पाणी पुरवठा या दोन बाबी प्रामुख्याने हाती घेतल्या आहेत. दररोज होणा-या पाणी पुरवठ्यात वाढ करण्याबरोबर जलकुंभांची संख्या वाढवणे, नवीन जलवाहिन्या तसेच जुन्या व जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलणे, जलशुध्दीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे.

शहराला सध्या प्रतिदिन ५२० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात साडेपाच टक्के वाढ गृहीत धरून प्रतिदिन ५२० दशलक्ष लिटर पुरवठा सध्या शहराला केला जातो.

व्यवस्था बळकट करणार
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्याचा भाग म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या ११९ जलकुंभांव्यतिरिक्त सध्या शहरात ३० जलकुंभांची कामे प्रगतिपथावर केली जात आहेत. त्यात सर्वधिक नऊ जलकुंभांची संख्या पंचवटीत आहे. या ३० जलकुंभांची साठवण क्षमता ६० दशलक्ष लिटर इतकी होणार आहे.

३५ हजार कोटींची कामे होणार
प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नाशिक-
त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26
Video thumbnail
हातात माळ, कपाळावर टिळा; रणवीर सिंगने काशीमध्ये घेतलं महादेवाचं दर्शन!
00:30
Video thumbnail
Latur|अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्याची सक्ती केल्यास कारवाई. तृप्ती अंधारे ऍक्शन मोडवर.
03:22
Video thumbnail
Latur|ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
01:31
Video thumbnail
Latur Zp|ऑनलाईन प्रणाली बंद, तरीही लातूर जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार सुरू
01:55
Video thumbnail
Latur|आरटीओ अधिकाऱ्यांवर 35 हजारांची लाच मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
03:19
Video thumbnail
Latur|राजीव नगरमध्ये तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधीचं साम्राज्य;नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
02:50
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये खत-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी;खरीप तयारीला वेग...
02:21
Video thumbnail
धाराशिव: पवनचक्की प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी गजाआड; १० गुन्हे उघड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
01:12
Video thumbnail
परभणीत मान्सूनपूर्व वादळाचा धुमाकूळ;मांडाखळीत फळबागा उद्ध्वस्त, वीज खांब कोलमडले, झाड कोसळून बैल ठार
01:18
Video thumbnail
Latur|आमदार आणि आमदार पुत्राच्या त्रासाला कंटाळलेले दोन शेतकरी एकमत डिजिटल स्टुडिओमध्ये
11:51
Video thumbnail
अधिक महिन्यामुळे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; चंद्रभागा नदीपात्राला पार्किंगचे स्वरूप
02:00
Video thumbnail
लातूरमध्ये भाविकांच्या श्रद्धेला तडा; कोट्यवधींचा निधी पळवणारे किशोर महाराज शिवणीकरांवर गुन्हा दाखल!
06:19
Video thumbnail
Latur|अखेर किशोर महाराज शिवणीकर उर्फ ‘पिस्तुल्या महाराज’ यांच्यावर गुन्हा दाखल
04:45
Video thumbnail
उदगीर-जळकोट महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेनंतर CNG ऑटोचा स्फोट, रिक्षा जळून खाक, चालक बचावला
00:36

Latest news