नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी
रेल्वे स्थानकाजवळील जेलरोड पवारवाडीजवळ शनिवारी रात्री कर्मभूमी एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेमधून पडल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत व जखमीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघालेली व बिहार राज्यातील रस्तोलकडे जाणारी कर्मभूमी एक्सप्रेस गाडी क्रमांक १२५४६ ही शनिवारी रात्री आठ वाजून १८ मिनिटांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आली.

काही वेळाने कर्मभूमी एक्स्प्रेस पुढे निघाल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील पवारवाडीजवळील साईनाथ नगर येथील मारुती मंदिराजवळ ही दुर्दैवी घटना घडली. कर्मभूमी एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेतून पडलेले दोघे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. या घटनेत आणखी एक प्रवासी रेल्वे खाली पडून गंभीर जखमी झाला आहे. सध्या दिवाळीमुळे रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी आहे.

धावत्या रेल्वेतून तिघेजण खाली पडल्याचे इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे साईनाथ नगर भागातील रेल्वे लाईनजवळ राहणा-या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे लोको पायलट के. एम. डेरे यांनी या अपघाताची माहिती नाशिकरोड रेल्वेस्थानक उपप्रबंधक कार्यालयात दिली. रेल्वे पोलिस व नाशिकरोड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news