26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रनाशिकमधल्या हॉटेलमधून पाच कोटी जप्त

नाशिकमधल्या हॉटेलमधून पाच कोटी जप्त

नाशिक : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. आज राज्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. यात पाच कोटींहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.

नाशिकमधल्या या नामांकित हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या नावे २ खोल्या बूक आहेत. एका काळ्या रंगाच्या कारमध्ये या बॅगा सापडल्या आहेत. पाच कोटींपैकी २ कोटी जप्त केले असून, उर्वरित पैशांचा शोध सुरू आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR