नाशिक : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत बंधा-यामध्ये आईसह तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत बंधा-यामध्ये पोहण्यासाठी गेलेली तीन मुले गाळात अडकल्याने त्यांना वाचवण्यास गेलेल्या आईचा देखील बंधा-यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून हे कुटुंब यवतमाळ जिल्ह्यातील असून ते पुणे येथे मजुरीसाठी जात असताना नांदूर शिंगोटे येथे थांबले होते.
त्यावेळी ही घटना घडली. मनीषा विजय रामजोशी (वय ३०), कार्तिक विजय रामजोशी (वय ९) या माय-लेकासह आदित्य राहुल शिंदे (वय ७), अविनाश राहुल शिंदे (वय ८) हे दोन्ही सख्खे भाऊ असे एकूण चार जणांचा बंधा-यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
















