परभणी : निझामबाद ते नांदेड दरम्यान धावणारी डेमू रेल्वे दोन दिवस रद्द करण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे ही रेल्वेगाडी रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षीण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत देण्यात आली आहे.
ही रेल्वे दि. २४ आणि ३१ मे रोजी तांत्रिक कारणांमुळे दोन दिवस रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ७७६४५/७७६४६ निजामाबाद – नांदेड डेमू रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रवासापूर्वी गाड्यांच्या अद्ययावत माहितीसाठी रेल्वे चौकशी सेवा अथवा अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
















