लातूर : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय पातळीवर २०० देशांमध्ये कार्य करणारी रोटरी क्लब लातूर श्रेयस या संस्थेअंतर्गत शिक्षक सन्मान व पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमांतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. संत तुकाराम मॉडल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी. ए. मैंदरगे, रोटरीच्या अध्यक्षा शालिनीताई पाटील, सचिव नामदेवराव साठे, माजी शिक्षणाधिकारी गिरी, डॉ. मायाताई कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती विद्यालयातील सहशिक्षक नितीन संदिपानराव कदम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आल.
याप्रसंगी जुक्टा संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. उदय पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. रामलिंग बिडवे, प्रा. गोविंद पडले, प्रा. संजय भंडारे, पंचशील पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मानकोसकर, उत्कृष्ट शेतकरी संदिपानराव कदम, उद्योजक बालाजी बुलबुले व इतर सहकारी बांधव समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
















