निधीसाठी जैशचे नामांतर; ‘अल-मुराबितुन’नवे नाव

कराची : वृत्तसंस्था
पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदच्या दहशतवादी संघटनेबाबत मोठी बातमी येत आहे. त्याने जैश ए मोहम्मद या संघटनेचे नाव बदलून अल-मुराबितुन असे ठेवले आहे. भारताविरोधातील दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्याच्या मार्गात येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांवर विविध देशांकडून आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निर्बंध लादले गेले आहेत. यामुळे त्यांना वेगवेगळ्या देशातील विद्रोही लोकांकडून पैसा गोळा करताना अडचण येत आहे. यामुळे सईदने आपल्या संघटनेचे नावच बदलून टाकले आहे. ‘अल-मुराबितुन’ या शब्दाचा अर्थ ‘इस्लामचे रक्षक’ असा आहे. या संघटनेने ई-वॉलेट आणि यूपीआयसारख्या डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर सुरू केला आहे. या माध्यमातून ते ४ अब्ज पाकिस्तानी रुपयांचा निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांना ३०० हून अधिक प्रशिक्षण केंद्रे (मराकाज) उघडायची आहेत.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर जैशने आपला तळ अफगाणिस्तानच्या सीमेवर, विशेषत: खैबर पख्तूनख्वा प्रांतात हलविला आहे. जैशने या भागात ‘मरकझ शोहादा-ए-इस्लाम’ या प्रशिक्षण केंद्राचा विस्तार केला आहे. तर हिज्बुल मुजाहिदीनने बंदाई, खैबर येथे ‘एचएम-३१३’ नावाचे नवीन प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. भारताने एलओसी जवळची ९ प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त केली होती. भारताने केलेल्या हल्ल्यात हाफिज सईदचे कुटुंबही मारले गेले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news