निधी नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ वितरीत करावा 

लातूर : प्रतिनिधी
अतिवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीबद्दल राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज दिवाळीआधी मराठवाड्यासह राज्यातील शेतक-यांना मिळणार होते. तशी घोषणाही सरकारने केली होती. दिवाळी संपून आठवडा उलटला तरी अद्याप हे पॅकेज बहुतांश शेतक-यांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे शेतकरी हताश होवून मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. याची दखल घेवून लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांची भेट घेवून राज्य सरकारने जाहीर केलेला निधी तत्काळ वितरणीत करण्यासंबंधी निवेदन दिले.
सध्याच्या अडचणीच्या, आपत्तीच्या काळात वेळेवर शेतक-यांना मदत मिळत नसेल तर राज्य सरकार, प्रशासन शेतकरी बांधवांप्रती किती गंभीर आणि किती संवेदनशील आहेत, हे लक्षात येते. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतक-यांपर्यंत प्राधान्याने मदत पोचली पाहिजे, या सोबतच नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमीनीचे पंचनामे करून त्या संदर्भात देखील योग्य ती कार्यवाही तात्काळ व्हावी. राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या काळात खूप पाऊस आणि पूर झाल्यामुळे अनेक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके आणि मालमत्ता दोन्ही नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शेतक-यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
लातूर तालुक्यातील शिराळा, खंडाळा, हिसोरी, भातखेडा व खुंटेफळ तसेच तालुक्यातील इतर गावामध्ये शेतक-यांना नुकसानीच्या अनुदानाची रक्कम जमा झाली झालेली नाही. शेतक-यांनी तातडीने अनुदान वितरीत करणे व नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करणेबाबत विनंती केली आहे. अनुदानाची रक्कम जमा झाली तर नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतक-यांना काहीसा आधार मिळू शकेल.  त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाची रक्कम त्वरीत वितरीत करणे आणि नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करणेबाबत महसुल व कृषी विभागास आदेशित करावे असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news