निधी संकलनात लातूर जिल्हा राज्यात द्वितीय

लातूर : प्रतिनिधी
प्रत्येक वर्षी ७ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. ७ डिसेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत लातूर जिल्ह्याला ४७ लक्ष रुपये निधी संकलनाचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. मात्र, जिल्ह्यात १ कोटी १५ लाख ९५ हजार रुपये निधी संकलन करून २४६.७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. त्यामुळे निधी संकलनात जिल्ह्याने सलग दुस-या वर्षी राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. यंदाही जिल्ह्याला ४७ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील  जास्तीत जास्त नागरिकांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास जिल्ह्यात दि. ९ डिसेंबरपासून प्रारंभ झाला आहे. देशाच्या संरक्षणासाठी लढणा-या, बलिदान करणा-या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी यामाध्यमातून आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील सैनिक, माजी सैनिक कुटुंबियांना मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक बोर्डाच्या अध्यक्ष श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा सैनिक अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.), ईसीएचएसचे प्रभारी अधिकारी कर्नल प्रकाश राजकर (नि.), ले. कर्नल बी. आर. हरणे (नि.) यांच्यासह  वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. प्रारंभी वीरमाता, वीरपिता यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आपल्या देशाचे संरक्षण करणा-या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. या सैनिक, माजी सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांना हातभार लावण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात आपले योगदान द्यावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.  सैनिक, माजी सैनिक कुटुंबियांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अभिसरणासह इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. माजी सैनिक कुटुंबातील महिलांना आर्थिकदृृष्ट्या सक्षम बनविण्यासाठीही विशेष उपक्रम हाती घेण्यात  येतील, असे जिल्हाधिकारी
म्हणाल्या. ‘गंध स्वरांचा’ टीमने यावेळी देशभक्तीप्र गीतांचे सादरीकरण केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एस. व्ही. घोंगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33

Latest news