नियम धाब्यावर बसवून पणनने दिली अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपन्यांना परवानगी!

लातूर : प्रतिनिधी
दोन सोयाबीन खरेदी केंद्रांमध्ये १० किलो मीटरचे अंतर असावे, तसेच २०२४-२५ मध्ये ज्या कंपन्यांनी सोयाबीन खरेदी केले त्याच कंपन्यांना यंदाही प्राधान्य देण्याचा नियम असताना पणन विभागामार्फत मात्र नियम धाब्यावर बसवून नवीन अ‍ॅग्रो प्रोड्युसर  कंपन्यांना परवानगी दिली आहे. ही परवानगी अर्थपुर्ण असल्याची चर्चा असून पणन विभागामार्फत ७० अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपन्यांना सोयाबीन खरेदीची परवानी देण्यात आली आहे.
अतिवृष्टीने शेतक-यांचे मोठे नूकसान झाले. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. उरले- सुरले हातात पडले पण त्या शेतीमालाला भाव नाही. बाजारात सोयाबीनची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. शेतक-यांना आधार हवा आहे. त्याचा शेतीमालाला हमीभाव हवा आहे. शासनाने तत्काळ हमीभाव केंद्र सुरु करणे अपेक्षीत असताना विलंब लाबला.  पणन विभागाने ७० अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपन्यांना परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना पणन विभागाने सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे समोर येत आहे. सन २०२४-२५ मध्ये सोयाबीन खरेदीचे काम करणा-या जुन्या कंपन्यांना डावलून नवीन कंपन्यांना परवानगी दिली आहे. यात १० किलो मीटर अंतराच्याही नियमाला पणन विभगााने हरताळ फासला आहे. यात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे.
लातूर जिल्हा हा सोयाबीनचा हब म्हणून ओळखला जातो. अतिवृष्टी आणि पुराचा जबरदस्त फटका बसल्यानंतर उरले-सुरलेले सोयाबीन तरी हभीभावाने खरेदी होईल, अशी शेतक-यांची अपेक्षा आहे. परंतू,  अद्याप हमीभाव केंद्रांवर सोयाबीची खरेदीच सुरु झाली नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. एकीकडे हमीभाव केंद्र सुरु होत नाहीत तर दुसरीकडे बाजारात ऐन सणासुदीत शेतक-यांना सोयाबीन कवडीमोल दराने विकावे लागले.  शेतक-यांचे सोयाबीन लवकरात लवकर हमीभावाने खरेदी करणे आवश्यक असताना केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि पणन विभाग यांचे काय धोरण आहे, हे शेतक-यांना कळेनासे झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news