Homeमहाराष्ट्रनियम मोडणा-यांना धडा शिकवा

नियम मोडणा-यांना धडा शिकवा

बारामती : प्रतिनिधी
कधी-कधी मोटारसायकलवाले इकडे-तिकडे बघतात. हळूच ओव्हरटेक-राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करतात. पण, आता असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत. अजिबात नियम कोणीही तोडू नका, मग तो अजित पवार असो किंवा अजित पवारचा कोणी नातेवाईक असेल. सर्वांना नियम सारखा आहे, असा दमच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीकरांना भरला.

उपमुख्यमंत्री पवार यांनी बेशिस्त वाहन चालवणा-यांना चांगलेच फटकारले. ‘मी जे करतो ते बारामतीकरांसाठी, सर्वांसाठी करतो. मी अनेक ठिकाणी झाडं लावली आहेत. तिथे कोणी पण येत आहे. जनावरे खात आहेत. पण, तसे चालणार नाही. जिथे माणसांना बसायला केले आहे तिथे एकजण मोटारसायकल लावून निवांत मांडी घालून लोकांसोबत गप्पा मारतोय. कधी-कधी मोटारसायकलवाले इकडे-तिकडे बघतात. हळूच ओव्हरटेक-राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करतात. पण, आता असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत.

यातील काही लोक तर रस्त्यावर कचरा टाकत आहेत. जनावरे चरायला सोडत आहेत. पण, आता मी त्यांना कृपा करून सांगतो आता ती जनावरं कोंडवड्यात घातली तर ठीक, नाही ऐकले तर त्यांना बाजार दाखवतो. आता जे मालक लोक आहेत, त्यांना निर्वाणीचा इशारा देतो. ऐकले तर ठीक, नाही ऐकले तर मालकांवर केसेस होतील, असे अजित पवार यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR