निलंगा : प्रतिनिधी
लातूर महानगरपालिकेत काँग्रेस व वंचीत आघाडीची एक हाती सत्ता आल्याने निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व औराद शहाजानी (ता निलंगा) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवत निकालाचा जल्लोष करण्यात आला.
यावेळी नगरपरिषदेचे गटनेते तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, उपजिल्हाप्रमुख सुधाकर पाटील, नगरसेवक डॉ. गजेंद्र तरंगे, सिराज देशमुख, इस्माईल मनियार, गणेश पेठकर, लाला पटेल, अॅड. संदीप मोरे, गोविंद सूर्यवंशी, तुराब बागवान, विरभद्र आग्रे, डिंगबर शिंदे, सुनील नाईकवाडे, अॅड. तिरुपती शिंदे, अॅड. भोसले, इलाही चौधरी, झटींग म्हेत्रे, महेश भोसले, शाहरुख पाटेवाले, शाहीद पटेल, नागनाथ घोलप, ओम शिंदे, यासिन मनियार, बालाजी सूर्यवंशी, अनुप टोंपे, चाँद शेख़ , मेघराज पाटील, नागेश टोंपे, संतोष धनुरे तर औराद शहाजनी येथे बालाजी भंडारे, हाजी सराफ, सलीम पठाण, अमोल डोरसिंगे,अंकूश भंडारे, विलासराव कांबळे, जिवन कांबळे, असीफ पटेल, विद्यासागर गांजुरे, मूकेश भंडारे, अभय भंडारे, बक्षू मूल्ला, दाऊद मूल्ला, गफार मोमीन, खमर शेख, जितू पाटील, डिंगबर अंतरेड्डी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

