निलंगा : लक्ष्मण पाटील
तालुक्यातील १६२ गावांपैकी ५६ गावांत पाणी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी ९४ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी ८४ प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, तालुक्यातील ६०२ सार्वजनिक हातपंपांपैकी तब्बल २७१ हातपंप बंद असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील १६२ गावांपैकी ५६ गावांत पाणी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी ९४ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी ८४ प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, तालुक्यातील ६०२ सार्वजनिक हातपंपांपैकी 331 चालू आहेत तर तब्बल २७१ हातपंप बंद असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. तालुक्यात ११७ ग्रामपंचायती असून, ४४ गावे आणि १२ वाड्या-वस्त्या व तांड्यांवर मिळून ५६ ठिकाणी पाणी अधिग्रहणाची कार्यवाही सुरू आहे. मार्च महिन्यापासूनच प्रशासनाने यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पंचायत समितीकडे प्राप्त ९४ प्रस्तावांपैकी ८४ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर उर्वरित १० प्रस्ताव क्षेत्रीय अधिका-यांकडे पाण्याची आवश्यकता तपासण्यासाठी प्रलंबित आहेत.
तालुक्यातील ६०२ सार्वजनिक हातपंपांपैकी ३३१ हातपंप सुरू, तर २७१ हातपंप साहित्याअभावी बंद आहेत. पाणीटंचाई तीव्र झाल्यानंतरच या हातपंपांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्यानंतर बंद हातपंप सुरू करता येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तालुक्यात ११७ ग्रामपंचायती असून, ४४ गावे आणि १२ वाड्या-वस्त्या व तांड्यांवर मिळून ५६ ठिकाणी पाणी अधिग्रहणाची कार्यवाही सुरू आहे. मार्च महिन्यापासूनच प्रशासनाने यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पंचायत समितीकडे प्राप्त ९४ प्रस्तावांपैकी ८४ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर उर्वरित १० प्रस्ताव क्षेत्रीय अधिका-यांकडे पाण्याची आवश्यकता तपासण्यासाठी प्रलंबित आहेत. सध्या तालुक्यात एकाही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, ज्या गावांत पाण्याची कमतरता जाणवते, तेथे अधिग्रहणाच्या माध्यमातून पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी हौदांची व्यवस्था केली आहे. आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हौद बांधून देता येणार आहेत.
















