22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeलातूरनिलंगा नगर परिषदेत नगराध्यक्षासह भाजपचे १५ नगरसेवक विजयी

निलंगा नगर परिषदेत नगराध्यक्षासह भाजपचे १५ नगरसेवक विजयी

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवक विजयी झाले तर काँग्रेसचे ८ नगरसेवक निवडून आले. यात जनतेतून थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपचे संजय हलगरकर यांना ९९१४ मते पडली तर काँग्रेसचे हमीद शेख यांना ७८९८ मते मिळाल्याने भाजपचे संजय हलगरकर हे २ हजार २६ मतांनी विजयी झाले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लिंबन महाराज यांना २७१२ मते मिळाल्याने ते तीन नंबरवर राहिले तर उर्वरित नगराध्यक्षपदाच्या चार उमेदवारांना स्वत:चे डिपॉझिट वाचवता आले नाही.

निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीची आज सकाळी १० वाजता येथील तहसील कार्यालयात प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. यात प्रभाग १ अ मधून भाजपाच्या आशा फुलारी ९०९ मते घेऊन ३३५ मतांनी विजयी झाल्या तर काँग्रेसचे मनिषा नाईकवाडे यांना ५७४ मते पडली व ब मध्ये काँग्रेसचे अजित नाईकवाडे यांनी ७७० मते घेऊन २० मतांनी विजयी तर भाजपा किशोर लंगोटे ७५० मते मिळाली, प्रभाग २ अ मध्ये भाजपच्या लक्ष्मीबाई नागदे या १०२२ मते घेऊन ५९७ मतांनी विजयी तर काँग्रेस गंगुबाई सालघंटे ४५५ मते, ब अ‍ॅड वीरभद्र स्वामी १०७० मते घेऊन ६६९ मतांनी विजयी तर काँग्रेसचे अशोक शेटकार ४३१, प्रभाग ३ अ मध्ये भाजपच्या पूजा मोहळकर १४११ मते घेऊन १०७४ मतांनी विजयी तर संगीता म्हेत्रे काँग्रेस ३३७, ब मध्ये भाजपचे ईश्वर गायकवाड पाटील ११५९ मते घेऊन ५८८ मतांनी विजयी तर काँग्रेस भवानीप्रसाद नाईकवाडे ५१७ मते पडली. प्रभाग ४ अ मध्ये भाजपचे रमेशकुमार कांबळे हे ८५९ मते घेऊन १० मतांनी विजयी तर काँग्रेसचे ओमप्रकाश शिंदे ८४९ मते पडली, ब मध्ये भाजपच्या सोनाली हाडोळे ९३० मते घेऊन १५१ मतांनी विजयी तर काँग्रेसच्या अनुसया सावरे यांना ७७९ मते पडली.

प्रभाग ५ अ मध्ये काँग्रेसच्या विजया वांजरवाडे ११२६ मते घेऊन १६७ मतांनी विजयी तर भाजपाच्या शोभा पोतदार यांना ९५९ मते पडली व ब मध्ये भाजपचे मासूलदार खदीर १२०५ मते घेऊन ३९४ मतांनी विजयी तर हमीद शेख काँग्रेस यांना ८११ मते पडली, प्रभाग ६ अ मध्ये भाजपच्या सुधा मारुती वाघमारे १०८४ मते घेऊन ६४ मतांनी विजयी तर काँग्रेसच्या वंदना सोमवंशी १०२० मते पडली व ब मध्ये काँग्रेसचे सिराज देशमुख १०३१ मते घेऊन १८ मतांनी विजयी तर भाजपाच्या रुकसाना शेख १०१३, प्रभाग ७ अ मध्ये काँग्रेसचे मणियार इस्माईल ७४२ मते घेऊन ८६ मतांनी विजयी तर भाजपा मनोज कोळे यांना ६५६ मते पडली व ब मध्ये काँग्रेसच्या भोसले सरोजा ८०७ मते घेऊन २१३ मतांनी विजयी तर भाजपा मोबिन निसा अत्तार यांना ५९४ मते पडली. प्रभाग ८ अ मध्ये भाजपचे धर्मप्रकाश निंबाळकर ११४८ मते घेऊन ५३० मतांनी विजयी तर काँग्रेसचे नागनाथ फुलारी यांना ६१८ मते पडली व ब मध्ये भाजपच्या मिनाक्षी निलंगेकर ११३५ मते घेऊन ५१६ मतांनी विजयी तर काँग्रेस सविता पाटील ६१७ मते पडली,

प्रभाग ९ अ मध्ये भाजपचे निळकंठ पेठकर यांनी ११८६ मते घेऊन २७१ मतांनी विजयी तर काँग्रेसचे अजगर अन्सारी यांना ९१५ मते पडली, ब मध्ये काँग्रेसच्या शिवगंगा पेठकर ११६८ मते घेऊन २४६ मतांनी विजयी तर भाजपाचे तबसुम शेख ९२२, प्रभाग १० अ मध्ये भाजपचे सचिन गायकवाड हे ८०६ मते घेऊन ४३२ मतांनी विजयी तर काँग्रेस गिरीश पत्रे ३७४ मते पडली व ब मध्ये भाजपच्या रंजना कांबळे ६६३ मते घेऊन १८५ मतांनी विजयी तर वंचितच्या मंजू निंबाळकर यांना ४७८ मते पडली, प्रभाग ११ अ मध्ये काँग्रेसच्या स्वाती सूर्यवंशी ११५६ मते घेऊन ३० मतांनी विजयी तर भाजपा अश्विनी सूर्यवंशी यांना १५२६ मते पडली. ब मध्ये काँग्रेसच्या राधिका पेठकर यांनी १७०३ मते घेऊन १२४ मतांनी विजयी तर भाजपाच्या रेश्मा माडीबोने क मध्ये भाजपचे नयुम शेख यांनी १४८० मते घेऊन ४४ मतांनी विजयी झाले तर काँग्रेसचे इलाही चौधरी १४३६ घेऊन पराभूत झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी घोषित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR