Homeलातूरनिलंगा नगर परिषदेस महापुरुषांची छायाचित्रे भेट

निलंगा नगर परिषदेस महापुरुषांची छायाचित्रे भेट

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांच्या दालनात महापुरुषांची छायाचित्रे लावण्यात यावीत म्हणून छायाचित्र भेट देत ती तात्काळ लावण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसचे गटनेते तथा शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष संजय हलगरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्ष म्हणून संजय हलगरकर यांची निवड झाल्यानंतर ४ महिने उलटूनही दालनात महापुरुषांची छायाचित्रे लावण्यात आली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी पदाधिका-यांनी महापुरुषांची छायाचित्रे नगराध्यक्षांना भेट देत, ती तातडीने दालनात लावून त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच शहरातील विविध मान्यवर व कार्यकर्त्यांनीही या मागणीस पाठिंबा दर्शविला. नगराध्यक्षांनी या मागणीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. यावेळी सिराज देशमुख, प्रा गजेंद्र तरंगे, इस्माईल मनियार, सौ विजया वांजरवाडे, सौ. सरोजा भोसले, सौ, शिवगंगा पेठकर , सौ. साधना पेठकर, सौ. स्वाती सूर्यवंशी, सोमवंशी तुषार यांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR