निलंगा येथे कडकडीत बंद; रास्ता रोको

निलंगा : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या लातूर जिल्हा बंदला निलंगा शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहर व तालुक्यातील दुकाने, आस्थापने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा  समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा  आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनामुळे काही काळ परिसरात वातावरणात चैतन्य निर्माण झाले. यानंतर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिका-यांना निवेदन देऊन मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. हैदराबाद गॅझेट लागू करणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे, सातारा-कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करणे, कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करणे, मंत्रालयात स्वतंत्र मराठा कक्ष सुरू करणे तसेच मागण्यांबाबत तातडीने शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन उपोषणाची सांगता करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निलंगा शहरासह तालुक्यात शासकीय कार्यालये, शासकीय व खासगी रुग्णालये, शासकीय व खासगी वाहतूक, पेट्रोल पंप आदी अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश आस्थापने बंद ठेवण्यात आली. दुपारनंतर सकल मराठा समाजाच्या वतीने बंद मागे घेऊन आस्थापने सुरू  करण्याचे आवाहन करण्यात आले. आंदोलनात सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news